Tractor Subsidy : मिनी ट्रॅक्टर्ससाठी तीन लाखांचे अनुदान मिळणारं

Tractor Subsidy : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor Anudan) आणि त्याची उपसाधने 90 टक्के अनुदानावर वाटप केली जातात. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून योजनेसाठी अर्ज दाखल केलेली सर्वच्या सर्व 28 प्रकरणे मंजूर करण्यात आली असून त्यांना प्रत्येकी 3 लाख 15 हजारांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

मिनी ट्रॅक्टर योजना (Tractor Scheme) फक्त महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध गटातील लाभार्थ्यांसाठी आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गट असणे अत्यंत आवश्यक आहे. बचत गटामधील कमीत कमी 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील अपेक्षित असून मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी शासनाकडून संबंधित लाभार्थ्यांना 3 लाख 15 हजार इतके अनुदान दिले जाते.

Tractor Subsidy

काय आहे योजना

सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसाहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येते. 3 लाख 15 हजार इतके अनुदान दिले जाते. 80 टक्के शासकीय अनुदान व 10 टक्के स्वयंसहायता बचत गटांचा हिस्सा या सूत्रानुसार योजना राबविली जाते. यासाठी बचतगट नोंदणीकृत असणे अपेक्षित आहे.

1 thought on “Tractor Subsidy : मिनी ट्रॅक्टर्ससाठी तीन लाखांचे अनुदान मिळणारं”

Leave a Comment