Rabi Crops : रब्बी ज्वारी पेरताय, कोणत्या वाणांची निवड कराल ?

Rabi Crops : महात्मा फुले कृषि विद्यापीठाने महाराष्ट्रातील रब्बी ज्वारी पिकविणाऱ्या निरनिराळ्या भागांकरीता जमिनीच्या प्रतीनुसार योग्य असे अधिक उत्पादन देणारे सुधारीत वाण विकसीत करुन त्यांची शिफारस केलेली आहे. यामुळे उत्पादनात 25% वाढ होते असे आढळून आले आहे.सुधारीत जाती…

हलकी जमीनीसाठी : फुले अनुराधाअवर्षण प्रवण भागात हलक्या जमिनीसाठी लागवडीस योग्य, पक्व होण्याचा कालावधी 105 ते 110 दिवस असून अधिक अवर्षणास प्रतिकारक्षम आहे. या वाणाची भाकरीची आणि कडब्याची प्रत उत्कृष्ट आहे आणि या वाणाचे कोरडवाहू मध्ये धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी 8 ते 10 क्विंटल व कडबा 30 ते 34 क्विंटल प्रती हेक्टरी मिळते.

Rabi Crops

मध्यम जमीन : फुले सुचित्राया वाणाची अवर्षण प्रवण भागात मध्यम जमिनीसाठी शिफारस केलेली आहे. या जातीस पक्व होण्यास 120 ते 125 दिवसाचा कालावधी लागतो. या वाणाचे दाणे मोत्यासारखे शुभ्र आहेत. भाकरीची व कडब्याची प्रत उत्तम आहे. या वाणाचे सरासरी धान्य उत्पादन 24 ते 28 क्विंटल तर कडबा उत्पादन 60 ते 65 क्विंटल कोरडवाहूमध्ये मिळते. हा वाण अवर्षणास, खडखडया, पानांवरील रोगास खोडमाशी व खोडकिडीस प्रतिकारक्षम आहे.

भारी जमीन : फुले वसुधाही जात भारी जमिनीकरीता कोरडवाहू व बागायतीसाठी शिफारस केलेली असून या जातीस 116 ते 120 दिवस पक्व होण्यास लागतात. या जातीचे धान्य उत्पादन कोरडवाहूसाठी 25 ते 28 क्विंटल तर बागायतीसाठी 30 ते 35 क्विंटल प्रति हेक्टर मिळते.

2 thoughts on “Rabi Crops : रब्बी ज्वारी पेरताय, कोणत्या वाणांची निवड कराल ?”

Leave a Comment